दही हंडी उत्सव २००९, नवी मुंबई गोविंदा पथक, ठाणे गोविंदा पथक, ह्यूमन टावर, श्री कृष्ण जन्माष्टमी, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत
 
वेबसाइट भाषांतरित करा
 
मराठी
इंग्रजीत भाषांतरित करा
स्प्यानिश मध्ये भाषांतरित करा
कॅटलन मध्ये भाषांतरित करा
 
 
मराठी
 

फेसबुक
ट्वीट्टर
यु टूब व्हिडिओ
फेव्हरेट करा
गुगल प्लस
मोबाईल साईट

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक 
ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक - ( रजि. क्र. महाराष्ट्र /  एफ १८७१३  / ठाणे )
 

"आई एकविरा देवी" च्या आशिर्वादाने "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची" स्थापना सन २००७ मध्ये करण्यात आली. नवी मुंबई शहरातील नावालौकीक नगर म्हणजेच "ऐरोली गांव". या गावात परंपरेने "आगरी -  कोळी" बांधव एकत्र येउन मोठ्या उत्साहाने सण साजरे करतात.

 
ऐरोली गावातील आगरी -  कोळी बांधवांच्या सहकार्याने व एकजुटीतुनच सन २००७ मध्ये "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची" स्थापना करण्यात आली व सतत गेली ८ वर्षे सातत्याने "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक" ऐरोली नगरच नव्हे तर संपूर्ण नवी  मुंबई व ठाण्यात  एक उत्कृष्ट गोविंदा पथक संबोधले गेले आहे.
 

"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक" हे महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोविंदा पथक असून पथकाचे नियोजन, नियंत्रण आणि जबाबदारी सांभाळण्याकरिता आम्ही १० सदस्यांची समिती नेमली आहे. तसेच प्रत्येक वर्षी सभासदांच्या सुरक्षिततेसाठी 'जीवन विमा' काढण्यात येतो.

 
"गोपाळकाला" म्हंटल की मुंबई, ठाणे, नवी मुंबई ईत्यादी उपनगरामध्ये मानवी मनोरे (थर) रचुन गोविंदा पथक आपले कौशल्य लोकांसमोर व आयोजकंसमोर सादर करून पथाकाचा बाल गोपाळ सलामी देऊन अथवा सादर करून "दही हंडी" फ़ोडत आसतो. ज्या प्रकारे "श्री कृष्ण भगवान" हंडी फोडून दही खात असे.
 
"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला" बक्षिस रुपी मिळणारी रक्कम ही ऐरोली गावातील सामाजिक कार्यासाठी व गावाच्या विकासासाठी वापरण्यात येते. तसेच गोविंदा पथाकासाठी म्हणजेच गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी लागणारे साहित्य व जीवन विमा ह्यासाठी काहीशी जमा रक्कम ठेवून उर्वरित रक्कम गावातील मंदिरे, समाजमंदिर, संस्कृतिक भवन ह्यांच्या साठी राखून ठेवली जाते.
 
"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक" ह्यामध्ये ऐरोली गावातील लहनानपासुन ते प्रौढांपर्यँत सर्वजण एकत्र जमा होउन सतत १ महिन्यापासून गोविंदा पथाकाचा सराव करण्याकरिता जमा होतात. आणि "गोपळकाल्याच्या" दिवशी प्रत्येकजण पथाकाचा सदस्य म्हणुन पथकाने दिलेला गणवेश परिधान करून "गावदेवी मंदिरात" आईचा आशीर्वाद घेऊन गोपालकाला खेळायला निघतात.
 
आमच्या "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाच्या" माध्यमातून ऐरोली गावाच्या विकासासाठी, सामाजिक कार्यासाठी, मदत व्हावी यासाठी एकच मानस करीत आहोत की या पुढे गावातील लोकांमध्ये एक्याची भावना वाढीस लागावी या साथी आम्ही प्रयत्नशील असू. या साठी आम्ही एकच संकल्प करीत आहोत की ऐरोली गावातील सण उत्सव सर्वानी एकत्र येउन साजरे करण्याचा. तसेच प्रतेकाच्या सुखः दुखाःत सहभागी होवून सामाजिक समतोल आणि सामाजिक बांधिलकी राखण्याचा आमचा प्रयत्न राहिल. आणि तो संकल्प तडीस नेण्यासाठी "आई एकवीरा" आम्हास बळ देवो, ही "आई एकवीरा" चरणी प्रार्थना.
 

| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |
| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |
| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |
| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |

डिसाईन बाय : 
वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर