ऐरोलीतील गोविंदा पथक झाले हायटेक, महाराष्ट्र टाईम्स  मधील गोविंदा पथक, दहीहंडी २०१०, कृष्ण जन्माष्टमी, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत
 
वेबसाइट भाषांतरित करा
 
मराठी
इंग्रजीत भाषांतरित करा
स्प्यानिश मध्ये भाषांतरित करा
कॅटलन मध्ये भाषांतरित करा
 
 
मराठी
 

फेसबुक
ट्वीट्टर
यु टूब व्हिडिओ
फेव्हरेट करा
गुगल प्लस
मोबाईल साईट

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक 
बातमी 
 
महाराष्ट्र टाईम्स - ऐरोलीतील गोविंदा पथक झाले हायटेक
 
ऐरोलीतील गोविंदा पथक झाले हायटेक
 
मनोज जालनावाला - पत्रकार
 

सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील गोविंदा पथकांनीही आता तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हायटेक पध्दतीचा अवलंब सुरु केला आहे. ऐरोली गावातील ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाने आपल्या गोविंद पथकाची संपूर्ण माहिती दर्शविणारी स्वत:ची वेबसाईट तयार केली आहे.
दहीहंडी उत्सवाच्या साधारणत: महिन्याभराआधीच गोविंदा पथकांचा सराव सुरु होतो. या पथकांमध्ये १४ -१५ वर्षांपासून ते पन्नाशीपर्यंतच्या व्यक्ती यात सामील होतात. ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाचे यावषीर् हे चौथे वर्ष असून यावषीर् दहीहंडी फोडण्याची तयारी त्यांनी जोरात सुरू केल्याचे पथकाचे कार्यकारी सदस्य कैलास मढवी यांनी सांगितले.
नवी मुंबईतील हजारो गोविंदा पथकांपैकी ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक हे पहिले आहे ज्यांनी स्वत:ची माहिती वेबसाईटद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रायत्न केला आहे. गोविंदा उत्सवासंदर्भात तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी इंटरनेटचा वापर जास्त करणाऱ्यांना याबाबतची माहिती मिळावी याच उद्देशाने गोविंदा पथकाची वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे कैलास मढवी यांनी सांगितले.
या वेबसाईटची डिझाईनिंग रोहन कोटकर यांनी केली असून ३ वर्षांमध्ये या पथकाद्वारे केलेले उपक्रम, पथकातील सदस्यांची नावे,अशा सर्व गोष्टींची माहिती या वेबसाईटमध्ये पुरविण्यात आली आहे. पथकाचे एकूण २५० सदस्य असून त्यातील १६० सदस्यांचा लाइफ इन्शुरन्स पथकाच्यावतीने काढण्यात आला आहे. शिवाय पथकाला मिळणाऱ्या रक्कमेचा वापर शैक्षणिक, सामाजिक व धामिर्क कामांसाठी करण्यात येतो. या निधीतूनच गावदेवी मंदिराची सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |
| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |
| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |
| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |

डिसाईन बाय : 
वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर